नगर – जिल्ह्यात करोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यात तब्बल 295 रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 307 इतकी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आज 193 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 58 हजार 157 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.34 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 295 ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 47, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 91 आणि अँटिजेन चाचणीत 157 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 16, जामखेड 5, नगर ग्रामीण 4, नेवासे 6, पारनेर 1, पाथर्डी 8, राहुरी 4, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 23, अकोले 9, कर्जत 2, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 2, नेवासे 3, पारनेर 2 पाथर्डी 2, राहाता 16, राहुरी 3, संगमनेर 15, शेवगाव 2, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 9, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 157 जण बाधित आढळून आले.
यामध्ये, मनपा 1, अकोले 17, जामखेड 8, कर्जत 10, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 8, नेवासे 8, पारनेर 5, पाथर्डी 12, राहाता 26, राहुरी 10, संगमनेर 34, शेवगाव 7, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 5, कॅन्टोन्मेंट 2, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 26, अकोले 15, जामखेड 12, कर्जत 5, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 15, नेवासे 14, पारनेर 8, पाथर्डी 28, राहाता 9, राहुरी 15, संगमनेर 18, शेवगाव 8, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट 1, आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.