भाजप नेत्याचा आचरटपणा : करोना हा प्राणी आहे; त्यालाही जगण्याचा अधिकार

नवी दिल्ली – करोनाविषाणूच्या कहराने फैलावलेली कोव्हिड-19 ची महामारी जगाला त्रासदायक ठरत असताना, लक्षावधी लोकांचे मृत्यु होत असताना आणि कोट्यवधी लोक बाधित होत असताना, काही नेते मात्र वेडपटपणाचा कळस करताना दिसत आहेत.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आचरटपणाचा कळस करताना ट्‌वीटरवर म्हटले आहे की, करोनाविषाणू हाही एक प्राणीच असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. याचाच अर्थ, रावत यांच्या मते करोनाला हद्दपार करणे म्हणजे निसर्गाविरोधातले कृत्य होण्याची शक्‍यता आहे.

रावत यांचे हे ट्‌वीट अनेकांनी रिट्‌वीट केले असून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. रावत यांनाही कोव्हिडची बाधा झाली होती. त्याचाच हा उलटा परिणाम आहे की काय, असेही अनेकांनी रावत यांना उद्देशून म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.