नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोज हजारो लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. अशी परिस्थिती असताना आता उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अजबच विधान केले आहे. कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असे धक्कादायक विधान त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले आहे. त्यांच्या या अजब विधानाने एकच खळबळ माजली आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या त्या वक्तव्याचा तो व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. त्यांनी गुरुवारी एका स्थानिक चॅनलला मुलाखत देताना म्हटले की, कोरोना व्हायरस एक जीव आहे, इतर लोकांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही मानव स्वत:ला बुद्धीमान समजतो आणि त्याला संपविण्यासाठी तयार आहोत. यामुळे कोरोना स्वत:ला सतत बदलत आहे.
रावत यांनी पुढे म्हटले की, ‘मानवाला सुरक्षित राहण्यासाठी कोरोना व्हायरसच्या पुढे जाण्याची गरज आहे’.त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत. देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर झगडत आहे आणि डोंगराळ भाग ते मैदानात प्रत्येक जागेवर हाहाकार उडालेला आहे. असे असताना नेत्यांची ही वक्तव्ये खेदजनक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
"कोरोना एक प्राणी है"
– पूर्व CM एवं BJP नेता त्रिवेंद्र सिंह रावतफिर तो इसका आधार कार्ड/राशन कार्ड भी होगा ? pic.twitter.com/1uhcb92JWQ
— Srinivas B V (@srinivasiyc) May 13, 2021
अशा लोकांच्या विधानवर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आपला देश जगात कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक सामना करत आहे, असं काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी सांगितलं. तर, या व्हायरस जीवाला सेंट्रल व्हिस्टामध्ये आसरा द्यायला हवा, असं टोला एका यूजर्सने लगावला आहे. कोरोनना एक प्राणी आहे. मग त्याला आधार कार्ड आणि रेशन कार्डही असायला हवं, असा चिमटा राष्ट्रीय युथ काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी काढला आहे.
काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी सांगितले की, असे लोकांच्या वक्तव्यामुळे आश्चर्य वाटू नये, आपला देश आज जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित संकट झेलत आहे. एका युजरने तर या कोरोना व्हायरस जीवाला सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमध्ये आश्रय दिला जावा, अशी चपराक लगावली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात येत आहे.