हैदराबाद – विमा नियंत्रकांनी विमा कंपन्यांना करोना कवच पॉलिसी सुरू करण्यास सांगितले होते. त्यानंतर बऱ्याच विमा कंपन्यांनी अशा प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे.
यामध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णावरील उपचाराच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. विमा नियंत्रकांनी विमा कंपन्यांना साडेतीन महिने आणि साडेसहा महिने व साडेनऊ महिन्याच्या पॉलिसी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यात 50 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरविला जातो. यातील प्रिमियम केवळ एक हप्त्याचा राहील आणि देशातील कोणत्याही भागात प्रीमियमची रक्कम बदलली जाणार नाही. विमा नियंत्रकाच्या सूचनाच्या चौकटीत जवळजवळ अर्धा डझन कंपन्यांनी अशा प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध केल्या आहेत.