पुणे : शहरात कोरोना विषाणू च्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. त्यातच आज पहाटे पुणे विमानतळावर दुबईवरून आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात अली असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्पाईस जेट कंपनीचे दुबई ते पुणे फ्लाईट नंबर SG 52 हे विमान पहाटे पुणे विमानतळावर पोहचले. या विमानातुन एकूण ११५ प्रवासी भारतात दाखल झाले आहेत. दरम्यान, या सर्व प्रवाशांची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्यात आलेली आहे. या तपासणीमध्ये COVID-19 संदर्भात संशयित रुग्ण कोणीही आढळून आलेले नाहीत.
दरम्यान, एका नागरिकांने स्वतःहून आजारी असल्याचे लेखी पत्रकात नमूद केल्याने त्याची नायडू हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित 114 प्रवासी यांना सारसबाग, सणस कॉम्प्लेक्स, स्वारगेट, पुणे या ठिकाणी क्वारनटाईन साठी 5 बसेसमधून पाठवून देण्यात आलेले आहेत.