टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील शिनगरवाडी टाकळी हाजी येथे 31 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
पुन्हा एकदा शिरूर तालुक्याच्या बेट भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नवी मुंबई या ठिकाणी राहणारे हे 7 जुलै रोजी शिनगरवाडी येथे आले होते . यावेळेस त्यांना 7 जुलै रोजी त्रास होऊ लागल्याने त्यांना कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. काल (दि.11) अकरा वाजता त्यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.
या जवानांच्या संपर्कात आलेले 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून संपूर्ण शिनगरवाडी गाव बंद केले आहे. या गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली असल्याची माहिती ती ग्राम विकास अधिकारी राजेश खराडे यांनी दिली आहे.