रांजणगाव (वार्ताहर): कोरोना रोगाची साखळी तुटलेल्या रांजणगाव गणपती येथे पुन्हा एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश सातव यांनी ही माहिती दिली.
संबंधित रुग्णाने स्वतः पुण्यातील एका खासगी रुग्णालयांमध्ये ही तपासणी केली असल्याचे डॉक्टर सातव यांनी सांगितले. या संबधित व्यक्तीच्या कुटुंबासह संर्पकातील दहा जणांना हाय रिक्स घोषित करण्यात आले असून या दहा जणांचे स्वँब तपासणी साठी पाठवण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. घराबाहेर पडताना प्राधान्याने मास्कचा वापर करावा. बिनकामाचे रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर यांनी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना केले आहे.