शिरूरच्या शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

शिरूर(प्रतिनिधी) : शिरूर शहरातील विठ्ठल नगर परिसरातील भुमि अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या 32 वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती शिरूर  ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.  तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना क्वारटांईन करण्यात आले आहे. त्यात शहरातील या कार्यालयात काम करणाऱ्या 16 व इतर 7 बाहेरील नागरिकांचा समावेश आहे.  यामुळे विठ्ठल नगर परिसरात व शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी याच कार्यालयात काम करणारी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर आता शासकीय कार्यालयात कोरोना घुसल्याचे सिद्ध झाले आहे. शिरूरमधील विठ्ठल नगर येथील भुमीअभिलेख कार्यालयात काम करणारी एक महिला काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव आढळली होती. ही महिला रोज केडगाव ते शिरूर असा प्रवास करून कामाला येत होती. यानंतर भुमी अभिलेख कार्यालयात दक्षता घेत असतानाच या कार्यालयात काम करीत असणाऱ्या आणखी एका महिलेसही अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर एका खाजगी लॅबमध्ये तीची कोरोना तपासणी करण्यात आली.

महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने शासकीय कार्यालयात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात रोज शेकडो नागरिक कामानिमित्त येत असतात त्यामुळे आता या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेवर पुणे येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खबरदारी म्हणून शिरूर नगर परिषदेच्या वतीने भुमिअभिलेख कार्यालयाचा परिसर आज निर्जंतुक करण्यात आला आहे. अशी माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.

1 Comment
  1. datta says

    एक महिनाभर टोटल शिरूर शहर बंद ठेवावा अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करावे

Leave A Reply

Your email address will not be published.