मुंबई – बॉलिवूड निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती ‘बोनी कपूर’ यांच्या घरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे संपूर्ण परिवाराला क्वारंटाईन मध्ये राहण्याची वेळ आली आहे. बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या संदर्भात बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पत्रक शेअर केलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या निवासस्थानी म्हणजेच लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला (वय 23) कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण अतिशय आजरी होता. त्यानंतर कपूर यांनी त्याला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितलं होत. दरम्यान, या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसी आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून त्या तरुणाला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं.
View this post on Instagram
Staying at home is still the best solution we have. Stay safe everyone 🙏🏻
बोनी कपूर पत्रात म्हणाले, “माझी मुलं माझ्यासोबत आहेत आणि ते सर्व ठिक आहेत. माझे इतर कर्मचारीही ठिक आहेत. आतापर्यंत आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत. विषेश म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत. आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो”.