मुंबई – कोरोनाव्हायरस आता बॉलिवूड कलाकारांच्या घरात पोहोचला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘रेखा’ यांच्या बंगल्याबाहेर तैनात असलेला सुरक्षा रक्षक पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा संपूर्ण बंगला सील केला असून, बंगल्याबाहेर कंन्टेंमेंट झोनची नोटीस लावली आहे.
वांद्रेच्या बॅन्डस्टँडमधील रेखा यांच्या ‘सी स्प्रिंग्स’ इमारतीत दोन सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर सध्या बीकेसीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता आमिर खान, करण जोहर या कलाकारांच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला होता. त्यांच्या घरात काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली.