बारामती : शहरातील समर्थनगर येथील भाजीपाला विकणाऱ्या एकास कोरोनचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. शहरातील श्रमिकनगर येथे कोरोनचा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर आज शहरात दुसरा रुग्ण आढळला आहे.
शहरात कोरोनचा दुसरा रुग्ण सापडला ही बाब बारामतीकरांसाठी धक्कादायक असून सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. शहरातील श्रमिक नगर येथील रिक्षाचालकाचा कोरूना ची बाधा झाल्यानंतर आठ दिवसानंतर कोणाचा दुसरा रुग्ण सापडला आहे .रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.
सदरची परिस्थिती लक्षात घेता समर्थ नगर हे केंद्र धरुन 3 किमी परिसरात कंटेनमेंट झोन तर म्हणुन 5 किमी परिसर बफर झोन घोषित करण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे अवाहन करण्यात येणार आहे.
कंटेनमेंट झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या रस्त्याने येणारे सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येत आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत सर्वे करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.