पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीलाही करोना संसर्ग

फरासखाना ठाण्यातील 20 ते 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी

पुणे  – फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला करोना संसर्ग झाला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संर्पकात आलेल्या 20 ते 25 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पाच जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा पोलीस कर्मचारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा वाहनचालक असून चऱ्होली भागात वास्तव्यास आहे. पती आणि पत्नीला करोनासारखी लक्षणे दिसून आल्याने तपासणीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या दोघांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, तो रहात असलेला परिसर आणि पोलीस ठाण्याचे आवार निर्जुंतीकरण करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.