नवी दिल्ली – देशातील करोना बाधितांची संख्या आज 81 दिवसांनंतर प्रथमच 60 हजाराच्या खाली आली आहे.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 58 हजार 419 नवीन करोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. देशातील सक्रिय बाधितांची संख्याही झपाट्याने कमी होताना दिसत असून आज देशात एकूण 7 लाख 29 हजार 243 सक्रिय करोना बाधित आहेत. दरम्यान गेल्या 24 तासांत एकूण 1576 करोना बाधितांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 713 इतकी झाली आहे.
दरम्यान काल रिकव्हरी रेट 96.27 टक्के इतका नोंदवला गेला आहे. काल दिवसभरात देशात एकूण 18 लाख 11 हजार 446 करोना चाचण्या घेण्यात आल्या. पॉझिटीव्हीटीचा रेट 3.22 टक्के इतका झाला आहे.