औंध – बाणेर आणि बालेवाडी परिसरातील वाइनशॉपच्या मालकालाच करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित मालकाची परिसरात दोन वाइनशॉप आहेत. ही दोन्ही दुकाने पालिका अधिकाऱ्यांनी सील केली आहेत.
लॉकडाऊनच्या काळात बंद असणारी वाइनशॉप चार मेपासून सुरू करण्यात आली आहेत. त्या दिवसापासून संबंधित मालकाची दोन्ही दुकाने रोज उघडण्यात येत होती. हा मालक दोन्ही दुकानांवर असायचा. त्याला करोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच घबराट पसरली आहे. दुकान मालकाच्या संपर्कात आलेले कामगार व नातेवाईक यांच्या सुद्धा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
मात्र, त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीसुद्धा या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी तीन जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.