महाराष्ट्र: राज्यासह देशातील करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेते करोना पॉझिटिव्ह होताना दिसत आहे. दरम्यान, या यादीमध्ये आणखी एका बड्या नेत्याचे नाव आले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत.
सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:ला सर्व अटींची पूर्तता करत होम क्वॉरंटाईन केले आहे व त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व मंडळींना, कार्यकर्त्यांना स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी असेही आवाहन केले आहे.
नितीन गडकरी यांनी स्वत:बद्दल सांगताना म्हटले की, करोना विषाणूची बाधा झाल्याचे कळताच त्यांनी स्वत:ला विलग केले. सर्वांनी योग्यती काळजी घ्या व नियमांचे काटेकोरपणे पालन करा असेही सांगितले.