मुंबई – अमेरिकेच्या प्रवासाचा इतिहास असणाऱ्या एका 29 वर्षीय युवकाला करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला. त्याने फायझर लसीचे तीन डोस घेतले असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा तरूण मुंबईत न्युयॉर्कमधून नऊ नोव्हेंबरला आला होता. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेऊन त्याची आरटी-पीसीआर चाचणी केली. त्यावेळी त्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विषाणूची जनुकीय संरचना तपासण्यासाठी त्याचे नमुने पुण्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलीकडे पाठवण्यात आले. त्यावेळी त्याला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संसर्गिताने फायझर – बायोन्टेकच्या लसीचे दोन्ही डोस अमेरिकेत घेतले होते. त्यानंतर त्याने फायझर लसीचा बुस्टर डोसही घेतला होता.
विषाणूच्या या आवृत्तीमुळे फेरसंसर्ग आणि संसर्ग होण्याची शक्यता यापुर्वीही व्यक्त केली जात होती. मात्र लसीकरण आणि बुस्टर डोसमुळे संसर्गाची क्षमता कमी होते. पण त्याचे परिणाम समजण्यासाठी आणखी तीन – चार आठवडे वाट पहावी लागेल
डॉ. राहूल पंडीत
सदस्य, राष्ट्रीय कोविड टास्क फोर्स