पुण्यात करोनाबाधित वाढीचा दर 10 टक्क्यांवर , 24 तासांत नवे 406 रुग्ण

पुणे  – शहरात मागील चार दिवसांपासून 400 च्यावर करोनाचे नवीन बाधित आढळत असले, तरी यापैकी तब्बल 60 टक्के जणांना सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. तर या कालावधीत बाधितांचा मृत्यू दरही कमी झाला आहे. शुक्रवारी 2 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात मागील चोवीस तासांत 4 हजार 777 जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी 406 जण बाधित आढळले आहेत. तर बरे झालेल्या 320 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कालावधीत पुण्यातील 2 रुग्णांसह तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 401 झाली आहे. यापैकी सुमारे 2 हजार 800 रुग्ण होम क्वारंटाइन आहेत.

 

1 हजार 124 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. यापैकी 413 रुग्ण अतिदक्षता विभागात असून, 249 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाख 68 हजार 866 झाली असून, त्यापैकी 1 लाख 59 हजार 14 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 हजार 451 जणांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.