पुणे – हवेली तालुक्यातील 10 गावांमध्ये रविवारी करोनाचे 78 बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यात करोना बाधितांची एकूण संख्या 4 हजार 831 वर गेली आहे.
हवेली तालुक्यात रविवारी दिवसभरात करोनाचे 40 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर रविवारी 4 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत हवेली तालुक्यात करोनाच्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 65 इतकी आहे.
देहू गावामध्ये 8, नांदेडमध्ये 4, किरकटवाडी 4, नऱ्हे 1, मांजरी बुद्रुकमध्ये 10, कोंढवे-धावडे 7, उरुळीकांचन 23, वाघोलीमध्ये 17, आव्हाळवाडी 1 आणि केसनंदमध्ये 3 असे एकूण 78 रुग्ण आढळून आले आहेत.
हवेली तालुक्यात करोनाचे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 680 इतकी आहे. तर सध्यस्थितीत हवेलीमध्ये गंभीर रुग्णांची संख्या 10 आहे.