नवी दिल्ली | corona infection after two doses of corona vaccine – देशामध्ये सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत जवळपास ६० कोटी नागरिकांनी लसीचा एकतारी डोस घेतला आहे. असं असलं तरी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही देशातील ८७ हजार नागरिकांना करोनाची बाधा झाली असल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असून दोन्ही डोस घेतल्यानंतरही ( infection after second dose ) बाधा झालेल्यांपैकी ४६ टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत.
केरळमध्ये लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जवळपास ८० हजार जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या ४० हजार नागरिकांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. लसीच्या दोन्ही डोस घेतल्यानंतर विषाणूची बाधा होत असल्याची प्रकरणं समोर येत असल्याने २०० बाधितांचे नमुन जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. मात्र लसीचे कवच भेदून होत असलेल्या बाधेमागे विषाणूचा नवा अवतार कारणीभूत नसल्याचं समोर आलं आहे.
करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजचे कवच भेदून विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या अनेक घटना जगभरातून समोर येत आहेत. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर आणखी एका ‘बूस्टर डोस’ची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, केरळ येथे देशातील सर्वाधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये येथे २१,४२७ नवे बाधित तर १७९ मृत्यू नोंदवण्यात आले. corona infection after two doses of corona vaccine