61 ते 70 वयोगाटीतील व्यक्‍तींना करोनाचा सर्वाधिक धोका

मृत्यूचे प्रमाण तब्बल 30 टक्‍के; आतापर्यंत 1 हजार 702 जणांना गमवावा लागला जीव

 

पुणे – शहरासह ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीत करोनाचा संसर्ग फोफावला आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येत वयवर्षे 21 ते 40 वयोगटातील व्यक्‍तींची संख्या अधिक आहे. त्याप्रमाणे मृतांमध्येही वयवर्षे 51 ते 70 या वयोगटातील व्यक्‍तींची संख्या अधिक आहे. त्यामध्ये 61 ते 70 या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण तब्बल 30 टक्‍के आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या मृत्यू संख्येत 1 हजार 702 मृत्यू म्हणजे जवळपास 74.1 टक्‍के पुरूष गटातील आहे. तर, 25.9 टक्‍के स्त्री गटातील आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर 2020 आणि फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये करोनाचा उद्रेक पहायला मिळला असून, एप्रिल 2021 मध्येही ग्रामीणमध्ये रुग्ण संख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. तर, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत मार्च 2020 ते मार्च 2021 या एक वर्षात करोनामुळे 2 हजार 296 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.

त्यामध्ये 1 हजार 702 पुरुष, तर 594 स्त्रीयांचा समावेश आहे. वयोगटानुसार मृत्युचा आलेख पाहिला तर वयवर्षे 61 ते 70 या वयोगटातील 668 व्यक्‍तींचा समावेश आहे. हे प्रमाण 29.1 टक्‍के आहे. त्यापाठोपाठ 51 ते 60 वयोगटातील 535, 71 ते 80 वयोगाटातील 373 आणि 41 ते 50 वयोगाटातील 372 जणांचा मृत्यू झाला आहे.

41 ते 80 या वयोगटातील एकूण मृत्यूचे प्रमाण 84.8 टक्‍के आहे. दरम्यान, बाधित सापडण्यामध्ये वयवर्षे 21 ते 40 या वयोगटातील व्यक्‍तींची संख्या अधिक आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी आहे. तर, वयवर्षे 51 ते 70 वयोगटातील व्यक्‍तींना मधुमेह, रक्‍तदाब यासह अन्य सहव्याधी असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.