पुणे – गेल्या 24 तासांत करोना बाधितांची संख्या 3,286 झाली असून, दिवसभरात 31 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 13 लाख 82 हजार 762 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आले. गुरुवारीही तब्बल 16 हजार 578 जणांच्या टेस्ट झाल्या. त्यामध्ये 2 लाख 47 हजार 629 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
त्यातील 2 लाख 13 हजार 914 जण बरे झाले आहेत. गुरुवारीही 1200 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
बाधितांमधील 28 हजार 578 जण ऍक्टिव्ह असून त्यातील 599 रुग्ण गंभीर आहेत.
तर, 1 हजार 489 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत 5 हजार 137 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात गुरूवारी मृत पावलेल्या 31 बाधितांचा समावेश आहे.