पुणे – ग्रामीण भागात अवघ्या दहा दिवसांत हॉटस्पॉट ग्रामपंचायतींची संख्या दुपटीने वाढली आहे. मंगळवारी (दि. 23) या संख्येने शंभरी पार केली असून, त्यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, मुळशी या तालुक्यांतील हॉटस्पॉट ग्रामपंचायतींची संख्या तब्बल दहाच्या पुढे आहे.
फेब्रुवारी 2021 च्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. महिन्याभरात (11 मार्चपर्यंत) ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतील दहापेक्षा अधिक करोनाबाधित संख्या असलेल्या 46 ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यानंतर चारच दिवसांत या हॉटस्पॉट संख्येमध्ये 21 ने वाढ झाली. मात्र, आज या संख्येने तब्बल शंभरीचा आकडा गाठला आहे. सुरुवातीला हवेली, शिरूर, इंदापूर, बारामती आणि खेड या तालुक्यांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वेल्हा तालुका सोडला तर अन्य सर्व तालुक्यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीणमधील सक्रिय बाधित संख्या 2 हजार 74 वर पोहोचली आहे.
तालुकानिहाय हॉटस्पॉट ग्रामपंचायत
जिल्ह्यातील तालुकानिहाय दहापेक्षा जास्त बाधित असलेल्या ग्रामपंचायती (कंशात सक्रीय बाधित संख्या)
आंबेगाव – घोडेगाव (30), निरगुडसर (12), अवसरी खुर्द (15), मंचर (74).
बारामती – माळेगाव बुद्रुक (34), पणदरे (39), गुणवडी (17), कोऱ्हाळे बुद्रुक (11), बारामती नगरपालिका (343)
भोर – भोर नगरपालिका (17).
दौंड – यवत (27), राहू (19), वाळकी (13), गार (12), कुरकुंभ (13), पाटस (16), लिंगळी (23), मळद (11), गोपाळवाडी (23), केडगाव (31), दौंड नगरपालिका (77).
हवेली – देहू (28), किरकटवाडी (16), नांदेड (53), नऱ्हे (96), लोणीकाळभोर (47), मांजरी बुद्रुक (45), कदमवाकवस्ती (34), सोरतापवाडी (10), उरूळीकांचन (75), वाघोली (220), केसनंद (19), आव्हाळवाडी (16), वडगाव शिंदे (17).
इंदापूर – बोरी (53), भिगवण (17), निरगुडे (15), अकोले (10), इंदापूर नगरपालिका (44).
जुन्नर – नारायणगाव (56), वारूळवाडी (22), ओतूर (24), उंब्रज (11), येडगाव (10), नालावणे (17), आळे (22), हिवरे तर्फे नारायणगाव (14), तेजेवाडी (12), कालवाडी (10), पिंपळवंडी (22), पिंपळगाव (12), जुन्नर नगरपालिका (26).
खेड – कुरूळी (14), चारोळी बुद्रुक (14), चिंबळी (10), खराबवाडी (22), महाळुंगे (17), मेदनकरवाडी (37), नाणेकरवाडी (24), निघोज (22), सांडभोरवाडी (12), वाकी खुर्द (10), आळंदी नगरपालिका (54), चाकण नगरपालिका (105), राजगुरू नगरपालिका (42).
मावळ – कामशेत (45), सोमाटणे (13), वराळे (14), कुसगाव बुद्रुक (12), वडगाव नगरपंचायत (26), लोणावळा नगरपालिका (68), तळेगाव नगरपालिका (212).
मुळशी – बावधन (55), भुगाव (34), हिंजेवाडी (69), कासारअंबोली (21), लवळे (13), मान (40), म्हळुंगे (36), मारूंजी (39), पिरंगुट (26), सुस (54).
पुरंदर – कोळविहीरे (11), जवळार्जुन (11), वाघापूर (10), सोनोरी (10), गळुंचे (12), पिंपरे खुर्द (10), जेजुरी नगरपालिका (18), सासवड नगरपालिका (104).
शिरूर – सणसवाडी (21), शिक्रापूर (88), तळेगाव ढमढेरे (19), रांजणगाव गणपती (31), न्हावरा (13), टाकळी हाजी (17), पाबळ (12), शिरूर ग्रामीण (41), शिरूर नगरपालिका (90).