पुणे – करोनाबाधित दोन हजारांच्या जवळ पोहोचले असून, मंगळवारी दिवसभरात 1,925 बाधितांची नोंद महापालिकेने केली. यामध्ये 575 बाधितांची ऍन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
करोना बाधितांची वाढ अद्यापही कायम असून, आता शहरातील परिस्थिती गंभीर होण्याला सुरुवात झाली आहे. बाधितांबरोबरच ऍक्टिव्ह रुग्णसंख्याही वाढली आहे. गेल्या 24 तासांत 677 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
2 लाख 21 हजार 210 बाधितांमधील 2 लाख 3 हजार 16 बाधित बरे झाले आहेत. मात्र, अद्यापही 13 हजार 225 बाधित ऍक्टिव्ह असून, त्यातील 394 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर, 798 बाधित ऑक्सिजनवर आहेत.
Patient
दिवसभरात 9 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन पुण्याबाहेरील आहेत. यांचा समावेश करून आजपर्यंत 4 हजार 969 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 12 लाख 63 हजार 696 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात 8 हजार 44 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.