पुणे – शुक्रवारी कमी झालेला नव्या करोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा वाढला. दिवसभरात नव्या 317 जणांना करोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर, आणखी नऊ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे, त्यातील तीन पुण्याबाहेरील आहेत.
शहरात एकूण आतापर्यंत 1 लाख 73 हजार 719 बाधितांची नोंद झाली, तर त्यातील 1 लाख 64 हजार 33 लाख नागरिक उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. शनिवारी 254 जणांना डिस्चार्ज देण्यात आले.
शहरात सध्या 5,150 जण ऍक्टिव्ह रुग्ण असून, त्यातील 383 क्रिटिकल आहेत. तसेच त्यापैकी 228 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आतापर्यंत करोनाने एकूण 4536 जणांचा मृत्यू झाला आहे.