मुंबई – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशद निर्माण झाली आहे. चीन मधील वुहान शहरातून सुरु झालेली ही साथ आता संपूर्ण जगभर पसरली आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक बडे कलाकार सुद्धा कोरोनाच्या जाळ्यात सापडले आहे.
अशातच आता ‘जेम्स बाँड’ फेम अभिनेत्री ‘ओल्गा कुरिलेंको’ हिला कोरोनाची लागण झाली आहे. कुरिलेंको यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे.
ओल्गा कुरिलेंकोने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बाँड सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 40 वर्षांची ओल्गा सध्या कोरोनासोबत झुंज देत आहे.