नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता चोवीस तास कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460 असा आहे. या कंट्रोल रूमसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची तर, सहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांनी बेडच्या उपलब्धतेसाठी कंटोल रूमशी संपर्क साधावा, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली आहे.