पुणे : मुंबईत बंदोबस्तासाठी गेलेल्या राज्य जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ मधील हे जवान आहेत. गट क्रमांक २ मधील सर्व जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील जवानांची टीम मुबंईत बंदोबस्तासाठी गेली होती. त्यातील १०० जवान तीन दिवसापूर्वी पुण्यात परतले आहेत.
त्यातील काही जवानांना सर्दी, ताप आदी लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील तीन जवानांना आता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईतून परतलेल्या सर्व जवानांची तपासणी करण्यात येणार आहे. या जवानांना रामटेकडी येथील अलंकार हॉलमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर काहींना महापालिकेच्या शाळेत विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.
राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ चे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये बंदोबस्तासाठी गेलेली एक कंपनी २० एप्रिलला पुण्यात परतली होती. ता सरावाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्वांची तपासणी केल्यानंतर फक्त तीनच जणांचे तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्या कोरोनाबाधित जवानांवर उपचार सुरु करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच उद्या सर्व जणांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.