ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांना करोनाची बाधा

ब्रासीलिया – जगभरात कहर केलेल्या करोनाची बाधा झालेल्यांमध्ये आणखी एका उच्चपदस्थाची भर पडली आहे. आता ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांना त्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. करोना संसर्गाची तीव्रता फार नसल्याची भूमिका बोल्सोनारो सातत्याने मांडत होते. त्यातून ते फेस मास्कशिवाय गर्दीत मिसळत होते.

करोना पॉझिटिव्ह ठरल्यानंतरही त्यांनी मी ठीक असल्याची मिश्‍कील प्रतिक्रिया दिली. जगातील इतर देशांप्रमाणेच ब्राझीलमध्ये करोनाचा प्रचंड फैलाव झाला आहे. त्या देशात 16 लाखांहून अधिक बाधित आहेत. त्याशिवाय, ब्राझीलमध्ये करोनाने 65 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. बाधित आणि बळींच्या संख्येचा विचार करता तो देश जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर अमेरिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.