मुंबई : जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या महाभयंकर व्हायरसमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जगभरात 88 हजारांहून अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांच्या पार गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे सहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर नव्याने 78 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचे नवे केंद्र अमेरिका झाल्याचे दिसून येत आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत दिसून येत आहेत. अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 4 लाखांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत येथे 4,27,101 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत आहे. येथे 4,27,101 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांत 1800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना बाधित स्पेनमध्ये आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 1,48,220 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 14,792 वर पोहोचला आहे. स्पेननंतर इटलीमध्येही कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा अधिक आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 1,39,422 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 17,669 लोकांचा मृत्यु झाला आहे.