राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना करोना

मुंबई – राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 8232 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये 861 पोलीस अधिकारी, तर 7371 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच करोनामुळे 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 अधिकारी आणि 86 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. तर 6314 जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामध्ये 640 अधिकारी आणि 5674 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 1825 पोलिसांमध्ये करोनाची तीव्र लक्षणे आहेत. यामध्ये 214 अधिकारी 1611 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोन लाख सात हजार 543 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात 31 हजार 671 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच 94 हजार 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 317 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यात 86 पोलीस जखमी झाले आहेत. तर पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 881 लोकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दंडात्मक कारवाईत सुमारे 16 कोटी 87 लाख रुपये दंड वसूल केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीवर हल्ल्याच्या 55 घटना घडल्या असून त्याबाबत ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.