#Corona : गुजरातने मोडला चीनचा ‘हा’ विक्रम 

सुरत – करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशात दिवसेंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत असून आज रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच गुजरातने चीनचा एक रेकॉर्ड तोडला आहे.

गुजरातमध्ये करोनाबाधितांची संख्या ४७वर पोहचली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्याने केवळ ६ दिवसांत २२०० खाटांचे हॉस्पिटल तयार केले आहे. याआधी चीनने १० दिवसांत हजार खाटांचे हॉस्पिटल उभारले होते. तर गुजरातने केवळ सहा दिवसांत २२०० खाटांचे हॉस्पिटल चार शहरांमध्ये तयार केले आहे. यासंर्भातील घोषणा गुजरात सरकारने २१ मार्च रोजीच केली होती.

असे आहेत २२०० खाटांचे हॉस्पिटल

गुजरात सरकारने अह्मदाबामध्ये १२००, सुरत ५००, वडोदरा २५० आणि राजकोट २५० खाटांचे हॉस्पिटल बनविण्यात आले आहे. ही हॉस्पिटल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) आणि केंद्रीय आरोग्य विभागाच्या गाइडलाइननुसार बनविण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.