‘या’ देशात मध्ये करोना वाढला; रूग्णवाढीचा वेग दुसऱ्या लाटेच्या तिप्पट

दुबई – जगातील काही देशांमध्ये पुन्हा करोनाने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. या देशांच्या यादीत ओमान देशाचा समावेश झाला असून तेथे पुन्हा करोनाचे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या देशात पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणाच्या वावरावर पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमान मध्ये करोनाची दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे. त्यामुळे त्या देशातील लॉकडाऊन गेल्याच आठवड्यात उठवण्यात आले होते. ओमान मधील ही नवीन लागण अत्यंत वेगाने होत असल्याचेही दिसून आले आहे.

मागच्या लाटेत करोना प्रसाराचा जो वेग होता त्याच्या तिप्पट वेगाने तेथे पुन्हा हा रोग पसरू लागल्याचे दिसून आल्याने तेथील चिंता वाढली आहे. ओमान मध्ये सध्या रूग्णालयात इतक्‍या मोठ्या प्रमाणात पेशंट दाखल होत आहेत की तेथील व्यवस्था हाताळणे रूग्णालयाच्या हाताबाहेर जाताना दिसत आहे.

कर्मचारी आणि बेड्‌सची संख्या कमी पडू लागली आहे. तशातच या देशात ब्लॅक फंगसचेही रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.