शिरूर (प्रतिनिधी)-शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कोरोना रोगाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची अफवा गोकुळ राजू शिंदे वय वर्षे 27 रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरूर जिल्हा पुणे मुळगाव मु.पो. जळके खुर्द ता. नेवासा जि. अहमदनगर २ ) शिरीष म्हस्कू डोमाळे वय वर्ष 26 रा.वागळे वाडी शिक्रापूर ता.शिरूर जि. पुणे यांनी त्यांचे मोबाईल फोनच्या स्टेटसवर पोस्ट ठेवून व ती एकमेकात प्रसारित करून खोटी अफवा पसरल्याने मौजे रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे येथिल गाव कामगार तलाठी श्री सतीश कैलास पलांडे वय वर्षे 35 रा. मुखई ता. शिरूर जि. पुणे यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दि. ११ / ०५ / २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींना स्टेशन कडून अटक करण्यात आली आहे .सदरची कारवाई संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,श्री जयंत मीना अप्पर पोलीस अधीक्षक बारामती व श्रीमती ऐश्वर्या शर्मा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री सुरेश कुमार राऊत व त्यांचे अधिनस्त पथकातील पोलिस हवालदार तुषार पंधारे . पोलीस नाईक अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश शेळके, पोलीस नाईक प्रफुल्ल भगत यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चमन शेख हे करत आहे.
अशाप्रकारे कोणीही कोरोना विषयक अफवा पसरून औद्योगिक क्षेत्रात अगर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री सुरेश कुमार राऊत पोलीस निरीक्षक यांच्याकडून देण्यात आला आहे.