“राम सेतु’च्या सेटवर करोनाचा विस्फोट; भूमिदेखील पॉझिटिव्ह

देशात करोनाचा प्रकोप पुन्हा वाढला आहे. या महामारीचा संसर्ग सर्वसामान्यांसह बॉलीवूड सेलेब्सनाही होत आहे. बॉलीवूडमधील अभिनेता अक्षय कुमार हा नुकताच करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर “राम सेतु’च्या सेटवर करोनाचा विस्फोट झाला असून, अभिनेत्री भूमी पेडणेकरला देखील संसर्ग झाला आहे.

याबाबत भूमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. भूमीने पोस्टमध्ये लिहिले की, माझी तब्बेत चांगली आहे, परंतु मला करोनाची काही लक्षणे जाणवत आहेत. सध्या मी डॉक्‍टरांकडून उपचार घेत असून, सर्व खबरदारी बाळगत असल्याचे तिने सांगितले. भूमी म्हणते, माझ्यात आज कोविड-19ची काही लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे मी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे.

तसेच डॉक्‍टर आणि हेल्थ प्रोफेशनल्स यांच्या सल्ल्याने औषध घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. सध्या मी वाफ घेत असून विटामीन-सी आणि खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देऊन आहे. दरम्यान, बॉलीवूडमधील काही कलाकार या महामारीच्या कचाट्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय गोविंदा, कार्तिक आर्यन, आलिया भट्‌ट यांनाही संसर्ग झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.