सातारा ( प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील वय 57 वर्षीय एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि पॅरिस येथून प्रवास करुन आलेल्या 35 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला असल्याने जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट मिळाले असून त्यांना कोविड 19 चा बाधा नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.