बारामतीच्या ग्रामीण भागात होतोय करोनाचा उद्रेक; बाधितांनी गाठली शंभरी

डोर्लेवाडी – बारामती शहरासह ग्रामीण भागात देखील आता करोनाचा हळुहळू उद्रेक होऊ लागला आहे. दिवसागणिक करोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने आता नागरिकांना धास्ती वाटू लागली आहे. ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे. बारामती तालुक्‍यातील बाधितांचा आकडा 91 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

आता ही गती वाढेल की काय, अशी भीती सर्वांना सतावू लागली आहे. दरम्यान, आता ग्रामीण भागात देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. झारगडवाडी, सोनगाव, डोर्लेवाडी, मेखळी, गुणवडी गावात दिवसागणिक करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत.

सध्या केंद्र सरकारकडून प्रत्येक गावासाठी अडीचशे कोविशिल्ड लस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लस साठ वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत दिली जात आहे. कुठलीही भीती न बाळगता कोविडशिल्ड लसीचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
– नितीन शेडगे,
सरपंच, झारगडवाडी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.