Corona Effect | रुपयाचे मूल्य 5 महिन्यांच्या नीचांकावर

मुंबई – भारतातील मोठ्या शहरात करोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या कारणामुळे देशातील निर्यातदारांनी डॉलरची विक्री वाढविली असल्यामुळे रुपयाचा दर कमी होत आहे.

आता डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पाच महिन्याच्या नीचांकावर आले आहे. काल रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर आजही रुपयाचे मूल्य 11 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव 74.58 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.

चार दिवसापासून रुपयाच्या मूल्यात एकतफी घसरण होत आहे. 13 नोव्हेंबर 2019 रोजी रुपयाचे मूल्य सध्याच्या पातळीवर होते. एल के पी सिक्‍युरिटीज्‌ या संस्थेचे वरिष्ठ विश्‍लेषक जतीन त्रिवेदी त्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर बळकट होत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. जर क्रुडचे दर आणखी वाढले तर रुपयाच्या मूल्यावर आणखी दबाव येऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.