करोना इफेक्‍ट; अंग्रेजी मीडियमला किरकोळ प्रतिसाद

फार मोठ्या आजारपणानंतर अंग्रेजी मीडियममधून इरफान खान पुनरागमन करत आहे. पण करोनाच्या साथीमुळे सर्व थिएटर बेमुदत बंद राहिल्याने त्याच्या या सिनेमाला फारच किरकोळ प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्‍स ऑफिसवर अंग्रेजी मीडियमने पहिल्या दिवशी जेमतेम 3.50 कोटी रुपयांचा धंदा केला होता.

इरफान खानसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या पुनरागमनाच्या महत्वाच्या सिनेमाला करोनामुळे मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यातही विश्‍लेषकांकडून सिनेमाचे खूप चांगले कौतुक केले गेले. पण तरिही बॉक्‍स ऑफिसवर सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. जम्मू, केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार आदी राज्यांमधील थिएटर बंद राहिल्यामुळे हा तोटा अंग्रेजी मीडियमला मिळाला आहे.

हिंदी मीडियमचा सिक्‍वेल असलेल्या अंग्रेजी मीडियममध्ये इरफानबरोबर प्रथमच करीना कपूर आहे. त्याशिवाय राधिका मदान आणि दीपक डोबरियाल हे कलाकारही आहेत. आता किमान दोन आठवडेभर तरी कोणत्याही नवीन सिनेमाचा रिलीज होऊ शकत नाही. हे लक्षात घेतले तर अंग्रेजी मीडियमची अवस्था कोणत्याही सिनेमाच्या बाबतीत होऊ शकते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.