मुंबई – कोरोना महामारीने भारतासह जगभरात थैमान घातलं आहे. इटली, इराण, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तानसह जगभरातीन अनेक देश या जीवघेण्याता व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केलं आहे. भारतात हा लॉकडाऊन तीन आठवडे म्हणजे 21 दिवस चालणार आहे.
दरम्यान, अशा परिस्थिती रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत अन्न पोहचावं या उद्देशाने ‘पार्ले’ कंपनीने एक मोठीघो षणा केली आहे. पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांचे वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनपर्यंत पार्ले कंपनी गरिबांसाठी बिस्किट पुड्यांचे वाटप करणार आहे.
सध्या या लॉकडाऊनच्या परिस्थिती अनेक नामांकित कंपन्यांही परिस्थितीचं गांभीर्य जाणून मदतीचा हात पुढे करत आहेत.