करोना इफेक्ट : लॉकडाऊन दरम्यान बिहारमध्ये झाले ऑनलाईन लग्न

नवी दिल्ली – करोनाने देशभरात हातपाय पसरल्याने अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे वर-वधू पित्यांची चिंता वाढली आहे. कधी हे विघ्न जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यातही काही नागरिकांनी संधी शोधली आहे. बिहारचा नवरा आणि पाटणाची नवरी या दोघांनी थेट ऑनलाईन लग्न केले आहे.

पाटणाच्या नवरी सदाब नसरिनचे उत्तरप्रदेशातील साहिबाबाद येथील डेनिश रझाबरोबर ऑनलाईन लग्न झाले. सदाबचे वडील सलाउद्दीन यांनी सांगितले कि, २४ मार्चला त्यांचे लग्न होणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे लग्नाचे आयोजन करणे शक्य नव्हते. गर्दीत करोना पसरण्याची शक्यता होती. यामुळे आम्ही ऑनलाईन लग्न करून दिले. केवळ मौलवींना आणावे लागले. याशिवाय घरातील बाकी सदस्य उपस्थित होते. लॉकडाऊन संपल्यावर नवरी सासरी जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.