पुणे- पुण्यात दोघांना कोरोनाची लागणं झाली आहे. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहे. सगळीकडे भीतीचं वातावरण असताना कशाचीही भीती न बाळगता आम्ही होळी साजरी करु, असं मत पुणेकरांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून जगात आणि भारतातही कोरोनामुळे सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. फार गर्दीत जाऊ नका, असं आवाहन सगळ्यांना करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनाची भीती बाळगू नका, सतत हात धुत रहा, मास्कचा नियमित वापर करा, गर्दीत जाणं टाळा, हस्तांदोलन करु नका, असं WHO ने सांगितलं आहे.