Corona Effect | वाढत्या करोनामुळे मार्च महिन्यातील मॅन्यफॅक्‍चरिंग क्षेत्राचा निर्देशांक ‘घसरला’

कारखान्यातील उत्पादनावर परिणाम

नवी दिल्ली – लॉकडाउन उघडल्यानंतर विविध क्षेत्रातील घडामोडी वाढल्या होत्या त्यामुळे मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राचा निर्देशांक पीएमआय 57.5 या पातळीपर्यंत गेला होता. मात्र मार्च महिन्यामध्ये देशात करणाचे रुग्ण वाढत असल्यामुळे या क्षेत्रातील घडामोडीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यातील मॅन्युपॅक्‍चरिंग क्षेत्राचा पीएमआय कमी होऊन 55.4 खाली आला आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हा निर्देशांक आणखीही 50 अंकाच्या वर आहे. हा निर्देशांक 50अंकांच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र काही प्रमाणात विस्तारत असल्याचे समजले जाते. लॉक डाऊनच्या काळामध्ये हा निर्देशांक बरेच महीने 50 च्या खाली होता.

याबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचा या शहरातील कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे या निर्देशांकावर परिणाम झाला आहे. या रोजगार निर्मितीवर परिणाम होऊ शकतो, असे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आहे आयएचएस मार्कीट या संस्थेने म्हटले आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये भारताचा विकास दर शुन्य टक्‍क्‍यापेक्षा कमी नोंदला गेला आहे. त्यामुळे वार्षिक विकास दरही कमी होणार आहेत. तिसऱ्या तिमाहीत विकास दर काही प्रमाणात शुन्य टक्‍क्‍यांच्या वर गेला असला तरी चौथ्या तिमाहीमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे विविध क्षेत्रावर बराच परिणाम झाला आहे.

याचा चौथ्या तिमाहीच्या विकास दराच्या आकडेवारीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विविध विश्‍लेषण करणाऱ्या संस्थांनी जाहीर केलेल्या अंदाजानुसार सरलेल्या वर्षाचा विकास दर उणे दहा टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.