कोरोना इफ्फेक्ट : वाघ्या-मुरळी कलावंतांवर उपासमारीची वेळ

टाकळी हाजी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपल्या कलेच्या आधारे उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतांनाही याचे परिणाम सहन करावे लागत आहेत. वाघ्या-मुरळी हे लोककलावंत अनादिकालापासून धर्म जागरण व कुलाचार पालन व समाजप्रबोधन करत असून कोरोना साथीमुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमूळे जागरण गोंधळ कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सदर कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले असून उपासमारीला तोंड देत आहेत.

सरकारने सदर गोष्टींचा विचार करून सामाजिक अंतर ठेवून वाघ्या-मुरळी कार्यक्रमांना परवानगी द्यावी तसेच या कुटुंबीयांना पेंशन योजना चालू करावी व आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे  व शिरूर तालुकाध्यक्ष बाळासो.कान्हेरे यांनी सर्व कलावंताच्या वतीने मुख्यमंत्री, सांस्कृतिक व न्यायमंत्री यांच्याकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.