मुंबई : मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
One more #COVID19 case confirmed in Dharavi,Mumbai.A 35-yr-old doctor has tested positive.His family put in quarantine,they’ll be tested today for #Coronavirus.Brihanmumbai Municipal Corporation tracing his contacts.Building where he resides in Dharavi sealed by BMC.#Maharashtra
— ANI (@ANI) April 3, 2020
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील ३५ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरला कोरोना झाल्याचे समजताच डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. तसंच, धारावीतील ज्या बिल्डिंगमध्ये डॉक्टर राहतो ती मुंबई महानगरपालिकेने सील केली आहे. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.