लखनौ- देशात करोनाचं संकट गडद झालं आहे. सर्वच राज्यात आरोग्य यंत्रणा कोसळली आहे. ऑक्सिजनअभावी अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील स्थिती आणखीच बिघडली असून रुग्णांना ऑक्सिजन मिळणं दुरापास्त झालं आहे. लखनौ येथून रुग्णालयातील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.
देशातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था कोसळल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे. येथे आईला ऑक्सिजन मिळत नसल्याने मुलीनं आईला स्वतः तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही महिलेचा जीव वाचवणं शक्य झालं नाही.
व्हायरल झालेला व्हिडीओ बहराईच येथील रुग्णालयातील आहे. याठिकाणी एका कोरोनाग्रस्त महिलेला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ती तडफडत होती. त्यावेळी तिच्या मुलीनं काहीही पर्याय समोर दिसेना म्हणून तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रदेश में ऑक्सीजन की किल्लत इस कदर है कि लोग अपनों की जान मुंह से ऑक्सीजन देकर बचाने की जद्दोजहद में हैं।
बहराइच का यह वीडियो योगी आदित्यनाथ जी के व्यवस्था पर करारा तमाचा है।
यूपी में भाजपा सरकार ऑक्सीजन तो देती नहीं है उल्टे ऑक्सीजन देने वालों पर FIR दर्ज कर लेती है। pic.twitter.com/ml5ASbtL3s
— UP Congress (@INCUttarPradesh) May 2, 2021
उत्तर प्रदेश काँग्रेसने या संदर्भातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळं उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांची काय अवस्था आहे हे समोर आलं आहे.