नवीन 5,529 रुग्णांची भर : 78 जणांचा मृत्यू
पुणे – शहरात मागील काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या सरासरी साडेपाच हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. मागील चोवीस तासांत तब्बल 6 हजार 530 बाधितांना डिस्चार्ज मिळाला आहे.
गेल्या 24 तासांत 5 हजार 529 रुग्णांची भर पडली आहे. मात्र, एकाच दिवसांतील मृतांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून, पुण्यातील 56 रुग्णांसह 78 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका हद्दीबाहेरील 22 रुग्णांचा समावेश आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 51 हजार 920 पर्यंत कमी झाली असून, यापैकी 1 हजार 314 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 6 हजार 235 वर पोहोचली आहे.
शहरात आतापर्यंत 3 लाख 82 हजार 491 जण बाधित झाले असून त्यापैकी 3 लाख 24 हजार 297 बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 274 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 24 हजार 409 संशयितांची स्वॅब टेस्ट टेस्ट करण्यात आली आहे.