नवी दिल्ली – त्यांचा एकमेकांशी साधा परिचयही नाही… पण पुढच्याच मिनिटाला ते एकमेकांशी जोडले जातात… निमित्त… तिघांच्या आयुष्याची दोरी मजबूर ठेवणारा ऑक्सिजन या तिघांना एकाच टाकीतून फक्त वेगवेगळ्या नळींनी देण्यात येत आहे.
पार्वती देवी, ओमदत्त शर्मा आणि दीपक हे गुरू तेजबहादूर रुग्णालयाच्या बाहेर एका ऑक्सिजन सिलिंडरवर आपला श्वसोश्वास सुरू ठेवत आहेत. देशाच्या राजधानीत ऑक्सिजनचा विलक्षण तुटवडा जाणवत असल्याने सरकारकडे वारंवार मदतीची याचना करावी लागत आहे.
ओमदत्ता यांना जमीनीवर झोपवले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना आढळले. तेथे स्ट्रेचरही उपलब्ध नाहीत. ते कोणतीही जागा मोकळी सोडेत नाहीत. जमिनीवरही जिथे जागा मिळेल तेथे पेशंटची सोय करत आहेत. बुधवारी रात्री ओम दत्ता यांच्या 40 वर्षी मुलाचे चमनलाल यांचे याच रुग्णालयात निधन झाले. तो आपत्कालीन कक्षाबाहेर बेडची वाट पहात होता. पण, किमान त्याला स्ट्रेचर तरी मिळाले होते.
शुक्रवारी या तीन रुग्णांच्या भोवती त्यांचे कुटुंबीय थांबले होते. आळीपाळीने ते ऑक्सिजनचे पाईप बदलत होते. ते त्यांच्या रुग्णांना करोना वॉर्डात दाखल करण्याची वाट पहात आहेत. डॉक्टर आणि हॉस्पिटल दर तासाला येऊन ऑक्सिमिटरच्या सहाय्याने तपासणी करून जात आहेत.
आपल्या आईला दोन दिवसांपासून ताप आणि खोकला येत आहे. तिला दाखल करून घ्यावे म्हणून आम्ही शुक्रवारी पहाटे तीन वाजल्यापसून येथे वाट पहात आहोत, असे पार्वती यांचा मुलगा राम कुमार यांनी सांगितले. आम्ही शांती मुकुंद आणि मॅक्स रुग्णालयातही गेलो. त्यानंतर आम्ही पाच वाजण्याच्या सुमारास हेडगेवार रुग्णालयात पोहोचलो. तेथे तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण तेथे तिला छातीत दुखू लागले. मात्र त्यांच्याकडे ऑक्सिजन बेड नसल्याने आम्ही या रुग्णालयात आलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आम्ही या रुग्णालयात 11च्या सुमारास पोहोचलो. त्यांनी हा सिलींडर आणि स्ट्रेचर हॉस्पिटलबाहेर दिले. येथे आणखी दोन कुटुंब आहेत. तेही त्रस्त आहेत. तक्रार कोणाची करायची? अशी हताश भावना त्यांनी व्यक्त केली.
ओमदत्ता यांचा 16 वर्षांचा नातू मोहन यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या वडिलांच्या मृत्यूची घटना सांगितली. माझ्या वडीलांना येथे आणले त्यावेळी बेड नसल्याने आम्ही त्यांना हेडगेवार रुग्णालयात नेले. तेथेही बेड शिल्लक नसल्याने आम्ही पुन्हा येथे येतो. त्यावेळी माझ्या वडीलांना धाप लागली होती. त्यांना स्ट्रेचरवर ठेवून ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र, अर्ध्या तासातच त्यांचा मृत्यू झाला, असे तो म्हणाला.