Corona disaster : करोना रोखण्याबाबत दूरदृष्टीचा अभाव; रघुराम राजन मोदी सरकारवर संतापले

नवी दिल्ली – भारतात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यात भारताने एका दिवसात 4 लाख रुग्णवाढीचा विक्रमही मोडला आहे. तर मृतांची संख्या दर 24 तासांत तीन हजारांच्या पुढं गेली आहे. देशातील या स्थितीवरून आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन केंद्रातील मोदी सरकारवर संतापले आहेत.

करोनाची दुसरी लाट थोपविण्यात दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा गाफीलपणा भोवला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या वर्षीच्या करोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता पुन्हा करोना संसर्ग वेगाने वाढत आहे. करोनाबाबत तुम्ही सावध असता, तर लोकांना तुम्ही सांगू शकला असता की, करोना अजुन संपलेला नाही. ब्राझिलमध्ये झालेल्या स्थितीवरून तरी सावध व्हायला हवं होतं. व्हायरस पुन्हा परत येतो आणि आधीपेक्षा अधिक घातक ठरतोय, हे समजून घेणं गरजेचं होतं. मात्र पहिली लाट ओसरल्यानंतर आपण निश्चित झालो आणि त्यामुळं आपलं नुकसान होत असल्याचं मत राजन यांनी व्यक्त केलं.

दरम्यान करोनाच्या पहिल्या लाटेविरुद्ध भारताला यश मिळालं. त्यामुळे भारताने आपल्या लोकसंख्येनुसार लसीची उत्पादन केलं नाही. आता आपण सावरलो. हळुहळू लसीकरण करू, असा समज करून घेतल्यामुळे देशासमोर अडचणी निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.