न्हावरे -आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील 54 वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला.
त्यांच्यावर केडगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्याने व त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
गुयुवारी (दि. 27) सकाळी त्यांना न्हावरे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची करोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू केल्यानंतर दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला.