पुणे पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठांना करोना

पुणे- शहर पोलीस दलातील तीन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना करोना झाल्याचे समोर आले आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे.  मार्चपासून पोलिसांनी लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत अहोरात्र रस्त्यावर उतरून काम केले.

 

दरम्यान, शहरात करोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असतानाच पोलीस आयुक्तालयातील हे अधिकारी करोना पॉझिटिव्ह आले आहेत.

 

आयुक्तालयात मंगळवारी आठवडा आढावा बैठक (टीआरएम) संपल्यानंतर एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्या दालनात बैठक बोलवली. त्यानंतर दुपारी सदर अधिकाऱ्याला ताप आला. त्यांनी करोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, बैठकीत या अधिकाऱ्याजवळ बसलेल्या इतर दोघांनाही त्रास जाणवत असल्याने चाचणी केली. तेव्हा त्यांचा अहवालदेखील शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.

 

दरम्यान, ऍड. मोरे खून प्रकरणाचा उलगडा केल्यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर अधिकारी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच उपचार घेत आहेत. तसेच मागील काही दिवसांत या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.